अभिमत उदारमतवाद्यांचा संबंध बऱ्याच वेळा ‘राज्याचा सहभाग किमान असला पाहिजे’ या विचारसरणीला जोडला जातो. याचाच अर्थ असा की, सैन्यदल, कायद्याची अंमलबजावणी आणि इतर नॉन-एक्लूडेबल गुड्स यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व बाबी मुक्त देवाण-घेवाणीसाठी मोकळे ठेवले पाहिजेत. तसेच हे व्यवहार नागरिकांनी मुक्तपणे स्थापन केलेल्या संस्थांमार्फत केले गेले पाहिजेत. अशा राज्यांचे वर्णन काही वेळा ‘नाइट वॉचमन राज्य’ असे केले जाते; कारण अशा किमान सहभाग असलेल्या अत्यल्प राज्यांचा एकमेव उद्देश सार्वजनिक व्यवस्थेच्या महत्त्वाच्या सार्वजनिक पैलूंना पाठिंबा देणे हाच असतो. जॉन लॉक या लेखकाच्या मते, राज्य हे व्यक्तीमध्ये मुक्तपणे स्थापन केलेला एक अनुबंध आहे. जर राज्याने त्याच्या नागरिकांनी दिलेल्या मूळच्या अधिकारांपेक्षा अधिक सत्ता ताब्यात घेतली तर त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचे सयुक्तिक कारण अशा मंडळांना असते. अशा तऱ्हेने ‘अभिमत उदारमतवाद’ आणि ‘आर्थिक उदारमतवाद’ यांचा पाया समान आहे असे म्हणता येईल. अभिमत उदारमतवाद्यांची प्रवृत्ती निरंकुश आर्थिक धोरणांना पाठिंबा देण्याची असते आणि म्हणूनच अशा उदारमतवाद्यांचे चित्र आघाडीचे नवउदारमतवादाचे पुरस्कर्ते म्हणून रंगविले जाते.
उलटपक्षी, ‘राज्यांना अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभागी होऊ द्यावे अशी तीव्र इच्छा’ हे आधुनिक उदारमतवादाचे वैशिष्ट्य मानले जाते. बाजारपेठ नियमनाच्या स्पष्ट प्रवृत्तीमधून हे दिसून येते. अशा वेळी राज्याने सर्वांना जीवनावश्यक वस्तू आणि नागरी सेवा पुरविणे अपेक्षित असते. म्हणूनच सर्व हेतू आणि उद्दिष्टांसाठी आधुनिक उदारमतवाद ही उदारमतवादाची फार मोठी दुरुस्त केलली आवृत्ती आहे. या दुरुस्तीमध्ये प्रामुख्याने त्याच्याशी संबंधित असलेल्या परंपरागत आर्थिक धोरणांचा समावेश केला जातो तर अभिमत अथवा आर्थिक उदारमतवादी निरंकुश आर्थिक धोरणाला पाठिंबा देतात. कारण अशी धोरणे अधिक स्वातंत्र्य आणि खऱ्या लोकशाहीकडे घेऊन जाणारी असतात. आधुनिक उदारमतवादी असा दावा करतात की हे विश्लेषण अपूर्ण व दिशाभूल करणारे आहे. म्हणूनच राज्याने अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीच पाहिजे. मूलभूत उदार उद्दिष्टे आणि हेतू साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे. अशा तऱ्हेच्या आधुनिक विचारांचा संबंध एकोणिसाव्या शतकातील बेंजामिन कॉन्स्टंट व जॉन स्टुअर्ड मिल यांच्यासारख्या सिद्धान्तवाद्यांशी जोडला जातो. हेच विचार अलीकडच्या काळात जॉन डेवै, विल्यम बिव्हरिज आणि जॉन रॉवेल यांनी स्पष्टपणे मांडले आहेत. राजकीयदृष्ट्या आधुनिक उदारमतवाद हा अभिमत उदारमतवादाचा डाव्या विचारसरणीचा आहे असे मानले जाऊ शकते. कारण तो संपत्ती व सत्तेच्या पुनर्वितरणाचे साधन म्हणून राज्याचा वापर करण्यास तयार असतो. अधिक अनुरूप व समाजनिर्मितीसाठी असे करणे आवश्यक असते.
पुढील दोन विधाने विचारात घ्या :
(अ) अत्यल्प राज्याचे वर्णन काही वेळा ‘नाइट वॉचमन राज्य’ असे केले जाते.
(ब) सार्वजनिक व्यवस्थेच्या मूलभूत पैलूंना पाठिंबा देणे हा अत्यल्प राज्याचा एकमेव उद्देश असतो.
ब हे प्रतिपादन असून अ हे त्याचे कारण आहे.
अ हे प्रतिपादन असून ब हे त्याचे कारण आहे.
अ आणि ब हे संपूर्णपण असंबंधित आहेत.
अ आणि ब हे संबंधित आहेत; परंतु तार्किकदृष्ट्या संबंधित नाही.
Boost your performance with adaptive practice tests
Practice every concept in the syllabus
Compare your speed and accuracy with your peers
Download the app and practice on the go