Home
SELF STUDY
BrowsePracticeTestsPlaylistDoubts & solutionsFree live classesOther courses

Reading Comprehension

Quick practice

Question 1 of 5

पुढील 5 प्रश्न खालील उतार्‍यावर आधारित आहेत


हल्ली सगळ्याच शहरांमध्ये वाहनांच्या गर्दीमुळे पुष्कळदा वाहतूक कोंडी होते. त्यातही काही चालक बेदरकारपणे वाहने चालवितात. जी मंडळी नियमाप्रमाणे सावकाश वाहन चालवितात त्यांना अशा बेशिस्त चालकांचा राग येतो. त्यातही काही मंडळी मनातल्या मनात बेशिस्त चालकाला शिव्या देतात. काही जोरात ओरडतात, काही नुसते चरफडतात, काही संताप व्यक्त करायला स्वगताचा अवलंब करतात; म्हणजे मनाशीच बडबडतात. नाटकातील, सिनेमातील किंवा मालिकांमधील पात्रे अशी स्वतःशी बोलताना आपण नेहमी बघतो.


स्वगत म्हणजे आत्मसंवाद असतो. कधी तो व्यक्त होतो, कधी अव्यक्त. हा अव्यक्त संवाद आपणा सर्वांना कार्य करण्यासाठी मदत करतो. मेंदूने अवयवांना कार्यप्रवण करण्यासाठी दिलेला तो आदेश असतो. समजा, तुम्ही ऑफिसला निघालात, तसं स्वगत तुमच्या अवयवांना आज्ञा देते. तुम्ही आवराआवर करता, घड्याळाकडे बघत कपडे करता. तयार होताना मोबाईल वाजतो. निरोप मिळतो - मित्राची आई वारली. लगेच स्वगत बदलतं. सुट्टी टाकायला ऑफिसला फोन केला जातो. मित्राच्या घरी जाण्याची तयारी सुरू होते. आपल्या वर्तनाला आज्ञा देणारे स्वगत आपण प्रत्यही वापरत असतो, हवं तेव्हा बदलत असतो. पण हे इतके आपल्या अंगवळणी पडलेले असते की त्याची जाणीव आपल्याला नसते.


अल्बर्ट एलिस नामक मानसशास्त्रज्ञ अमेरिकेत होऊन गेला. त्याने वर्तनावर परिणाम साधणारी विवेकाधिष्ठित मानसोपचार पद्धती रूढ केली. त्याला ‘आरईबीटी’ (Rational Emotional Behaviour Therapy) असं नाव आहे. त्याचा मूळ गाभा हे स्वगत आहे. त्याच्या मते, आपलं बोलणं व आपली कृती या आधी मेंदूद्वारे आज्ञा दिली जात असते. हे नकळत घडतं. त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण सुरुवातीला वाहनचालकांचे उदाहरण घेतलं. एखादा संतापणारा चालक घरी आल्यावर सांगतो, ‘‘त्या मोटारसायकलवाल्या पोराने मला राग आणला. माझं डोकं खराब केलं.’’ पण, सत्य हे असतं की हा प्रकार मोटारचालकाच्या आत्मसंवादामुळे झालेला असतो आणि दोष त्या दुचाकीचालकाला दिला जातो. कारण त्याच वेळी शांत राहून आपली गाडी चालविणारे इतर चालकही असतात.


आपल्या रागलोभाचा दोष इतरांवर टाकायची सवय मनःस्वास्थ्याला घातक असते. स्वतःचे आचार, विचार, वर्तन यांवर स्वतःचा ताबा असणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतात. यासाठी आपण रागीट आहोत, चिडके आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. हे वागणं योग्य नाही, हे स्वतःशी कबूल करणं आवश्यक आहे. ‘मला हा स्वभाव बदलायचा आहे आणि मी स्वतः तो बदलू शकतो,’ ही खूणगाठ बांधणं मनःशांतीसाठी आवश्यक आहे. हा ‘आरईबीटी’ या संकल्पनेचा गाभा आहे. भावनांचा उद्रेक होण्यामागे काय विचार किंवा स्वगत आहे, याचा शोध घेणं ही स्वभाव बदलण्याची पुढची पायरी आणि हे नकारात्मक स्वगत बदलून सकारात्मक स्वगत करणं ही अंतिम पायरी. हे सगळं मनाच्या मनात ठरवलं जाऊ शकतं किंवा लिहून ठेवलं जाऊ शकतं. अशा सकारात्मक आत्मसंवादाची किंवा स्वगताची सवय लागली की आपोआप स्वभाव बदलू शकतो. मनावर ताबा येतो, मन शांत, स्वस्थ व सुखी होऊ शकतं. हे सगळे माझ्या स्वानुभवातून आलेलं मनोगत आहे.


उताऱ्यामधील ‘स्वगत‘ या शब्दाचा नेमका अर्थ काय ? 


(अ) आपल्या रागलोभांचा दोष इतरांवर टाकणे.

(ब) स्वतःशी मोठ्यांदा बडबड करणे.

(क) व्यक्त किंवा अव्यक्त स्वरूपात होणारा आत्मसंवाद.

(ड) स्वतःशी हळूहळू पुटपुटणे.

A

अ वगळता अन्य काही नाही

B

ब वगळता अन्य काही नाही

C

ड वगळता अन्य काही नाही

D

क वगळता अन्य काही नाही

Concepts

Get unlimited practice with MPSC subscription

pick

Boost your performance with adaptive practice tests

pick

Practice every concept in the syllabus

pick

Compare your speed and accuracy with your peers

pick

Download the app and practice on the go